"एसआयटी'ने घेतली बैठक; बाधितांची भेट
"एसआयटी'ने घेतली बैठक; बाधितांची भेट 
मुख्य बातम्या

"एसआयटी'ने घेतली बैठक; बाधितांची भेट

Vinod Ingole

यवतमाळ : विषबाधा प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीने सोमवारी (ता. 30) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व त्यानंतर रुग्णालयात बाधितांची भेट घेतली. अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग हे समितीचे अध्यक्ष आहेत.

कीटकनाशकांची विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात 22 जणांचे बळी गेले होते. त्यासोबतच 560 पेक्षा अधिक विषबाधित झाले होते. या प्रकरणी अवर सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्राथमिक चौकशी केली. त्याआधारे दोषी आढळलेले कृषी विकास अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित आणखी काही दोषींवर कारवाईची शक्‍यता आहे. त्याकरिता शासनाने विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी यवतमाळचा दौरा केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मॅरेथॉन बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, पोलिस अधीक्षक तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक, कृषी अधिकारी या बैठकीला होते.

बाधितांची घेतली भेट सध्या शासकीय रुग्णालयात विषबाधित चार रुग्ण आहेत. त्यांची भेट चौकशी समितीने घेतली. रुग्णांकडून फवारणी करताना काय काळजी घेतली होती, औषधे कोणती होती, कीटकनाशकांचे मिश्रण करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले होते का? असे अनेक प्रश्‍न समिती सदस्यांनी विचारले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT