economy
economy 
मुख्य बातम्या

जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या विळख्यात: आयएमएफ

वृत्तसेवा

वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्याने घसरण होत असून जग भीषण मंदीच्या विळख्यात सापडले आहे. या मंदीच्या गर्तेत आपण प्रवेश केला आहे. ही मंदी २०१९ च्या वित्तीय अरिष्टापेक्षा भयंकर असेल. या संकटातून सावण्यासाठी जगातील उदयोन्मुख बाजारपेठांसाठी किंवा विकसनशील देशांसाठी २.५ ट्रिलियन (२.५ लाख कोटी) डॉलरची आवश्‍यकता आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाल्या . 

क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी सध्‍याच्या आर्थिक स्थितीबाबत नुकतेच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ‘‘जगाने भयंकर मंदीच्या विळख्यात प्रेवेश केला आहे. हे आर्थिक अरिष्ट २००९ मध्ये आलेल्या वित्तीय अरिष्टापेक्षाही भयंकर असेल. सध्या जागितक अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली आहे. विकनशिल देशांमधील उदयान्मुख मार्केटला नवसंजिवनी देण्यासाठी तब्बल २.५ ट्रिलियन डॉलरची आवश्‍यकता आहे,’’ असे त्यांनी यामुळी नमुद केली.  

‘‘सध्याची स्थिती ही २०२१ मध्ये सुधारण्याचा अंदाज आहे. परंतु कोरोना विषाणूवर नियंत्रण केल्यास हे शक्य होईल. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पुन्हा आर्थिक उभारी घेण्यासाठी या देशांमधील संसाधने कमी आहेत, हे नाणेनिधीला माहित आहे. या देशांना देण्यात येणाऱ्या निधीमधून ‘अधिक करणे, चांगले करणे आणि यापुर्वी कधीही न झालेल्या गतीने करणे’ हे उद्दीष्ट आहे,’’ असे त्यांनी यावेळी सांगितले. आपत्कालीन मदतीची मागणी  जागातील उदयोन्मुख मार्केटमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये ८ हजार ३०० कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. या देशांमधील मार्केट ठप्प झाले आहेत. ही स्थिती सुधारू शकते परंतु यापैकी अनेक देशांमध्ये असणारी संसाधने अपुरी आहेत आणि या देशांवर आधीच कर्जाचा डोंगर आहे. यापैकी जवळपास ८० देशांचे उत्पन्न कमी आहे आणि त्यांनी यापुर्वाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे, अशी माहिती जॉर्जिवा यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT