हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून
हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून 
मुख्य बातम्या

हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी दिली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधान भवनात ते पत्रकारांशी बोलत होते.

बापट म्हणाले, की कामकाज सल्लागार समितीने सध्या ११ ते २२ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित केले आहे. या काळात प्रलंबित १३ विधेयके आणि नवीन अकरा अध्यादेश विधिमंडळात मांडले जाणार आहेत. २० तारखेला कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. कामकाज शिल्लक राहिले असेल तर कालावधी वाढवला जाईल.

विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी विरोधात असताना आपणही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत होता, याकडे लक्ष वेधले असता बापट म्हणाले, त्या वेळी जनतेचे प्रश्न मांडून आम्ही सभागृहाचे कामकाज करीत होतो. गोंधळ करून कामकाज बंद पाडत नव्हतो. दुर्दैवाने आता तसे होत नाही. राज्य सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार आहे. विरोधकांनी कामकाजात सहभाग घ्यावा, विरोधकांनी सहकार्य केल्यास कामकाज सुरळीत पार पडेल, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT