पणन संचालक पदी कोणा
पणन संचालक पदी कोणा 
मुख्य बातम्या

पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९०० उपबाजार आणि सुमारे दीड लाख कोटींच्या उलाढालीचा गाडा हाकणाऱ्या आणि पणन सुधारणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन संचालनालयाला नवीन सरकार पूर्णवेळ संचालक देणार का? हे नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे. विद्यमान पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल नोव्हेंबर अखेर सेवानिवृत्त होत आहेत. तर या पदासाठी अपर आयुक्त सतीश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड पात्र असून, पणन सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सनदी अधिकाऱ्यांची देखील नियुक्तीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पणन संचालक हे पद अपर आयुक्त दर्जाचे असून, सध्या सहकार विभागात सतिश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड हे दोन अधिकारी अपर आयुक्त दर्जाचे आहेत. सोनी यांच्याकडे सध्या सहकार आयुक्तांचा प्रभारी आणि मुंबई बाजार समितीच्या प्रशासकपदाचा पदभार आहे. तर डॉ. जोगदंड अपर आयुक्त म्हणून सहकार आयुक्तालयात कार्यरत आहेत. डॉ. जोगदंड यांनी यापूर्वी पणन संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, पणन संचालकपदी सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे धोरण राज्य सरकारने अवलंबिल्याने डॉ. जोगदंड यांची सहकार आयुक्तालयात बदली करून, त्यांच्या जागी दीपक तावरे यांची पणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांतच तावरे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर पणन संचालकपदी डॉ. किशोर तोष्णीवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान डॉ. तोष्णीवाल नोव्हेंबरअखेर सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सहकार आणि पणन विभागाचे लक्ष लागले आहे. 

पणन संचालकपदाच्या शर्यतीत विद्यमान प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी आणि डॉ. आनंद जोगदंड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शेतमाल विपणनाची व्याप्ती आणि केंद्र शासनाचे पणन सुधारणांचा आग्रह यासाठी या पदावर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे शेतकरी संघटनांची मागणी आहे. 

सोनी यांच्याकडे मुंबई बाजार समिती आणि सहकार आयुक्त अशी दुहेरी जबाबदारी असून. त्यांना पूर्णवेळ पणन संचालकपदी नियुक्ती देताना आताचे दोन्ही पदभार सोडावे लागणार आहे. सोनी यांना सध्याच्या दोन्ही पदांना न्याय देताना मुंबई - पुणे अशी ओढाताण होताना दिसत आहे. तर डॉ. जोगदंड पुन्हा पणन संचालकपदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे समजते. त्यामुळे पणन संचालकपदी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांचीही नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्णवेळ पणन संचालकांची गरज शेतमालाच्या पारंपरिक विपणन व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी केंद्र सरकार विविध पणन सुधारणा करत आहे. यामध्ये संपूर्ण नियमनमुक्ती, ई नाम, इलेक्ट्रॉनिक व्यापार, राष्ट्रीय बाजार, संपूर्ण नियमनमुक्ती आदी क्लिष्ट बदलांच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच फळे भाजीपाल्याच्या नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीचा अनुभव पाहता, चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्तीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. या पदासाठी पणन संचालकपदाचा अनुभव असलेले आणि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT