When will the auction of onions and vegetables start in Solapur district?
When will the auction of onions and vegetables start in Solapur district? 
मुख्य बातम्या

कांदा, भाजीपाल्याचे लिलाव कधी ? सोलापूरातील शेतकऱ्यांचा सवाल

टीम अॅग्रोवन

सोलापूर : राज्य शासनाने २२ मेपासून राज्यातील लॅाकडाउन काहिसा शिथिल करत विविध दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. पण, बाजार समित्याचे लिलाव सुरु करण्याबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत. शिवाय बाजार समितीचे प्रशासनही स्वतःहून त्याबाबत काहीच करत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

लॅाकडाउननंतर सोलापूर बाजार समितीत १ एप्रिलला केवळ एक दिवस लिलाव सुरु केला. पण, वाढत्या गर्दीमुळे पुन्हा ते बंद करण्यात आले. तेव्हापासून आजतागातयत जवळपास पावणेदोन महिन्यापासून बाजार समितीतील कांदा आणि फळे आणि भाजीपाल्याचे लिलाव पूर्णतः बंद आहेत. भुसार बाजार मात्र आठवड्यातीलल काही दिवस सुरु आहे. पण, तोही सकाळी सात ते अकरा यावेळेत आहे. 

सोलापूर ही बाजार समिती सीमावर्ती भागातील महत्वाची बाजारपेठ आहे. रोज ३ ते पाच कोटी रुपयांपर्यंतेच व्यवहार बाजार समितीत होतात. सध्या फळे आणि कांदा, भाजीपाल्याचा सर्वाधिक हंगाम असतो. त्यातही कांद्यासाठी ही समिती प्रसिद्ध आहे. पण, लॅाकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोयच नव्हे, तर आर्थिक नुकसान झाले आहे. 

सध्या शहरातील विविध सहा ठिकाणी भाजीपाला विक्रीची शेतकऱ्यांसाठी सोय केली आहे. पण, त्याठिकाणी लिलाव होत नाहीत. शेतकऱ्यांनी स्वतःहून विक्री करावयाची आहे. पण, तिथेही शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. अपेक्षित विक्री होत नाही, शिवाय अधिक शेतमाल विक्री होत नाही. आता राज्य शासनाने लॅाकडाउनमध्ये काहिशी शिथिलता दिली आहे. 

अनेक भागातील बाजारपेठा उघडल्या जात आहेत. स्टेशनरी, फर्निचर, इलेक्ट्रॅानिक्स, शालेय साहित्य आदींची दुकाने उघडली जात आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहारही सुरु करण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासन यावर गप्प आहेच, पण बाजार समितीचे प्रशासनही शासनाकडे बोट दाखवून शांत आहे. त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT