मुख्य बातम्या

कृषी योजनांच्या प्रचारासाठी व्हाॅट्सअॅप ग्रुपचा आधार

टीम अॅग्रोवन

अकोला : कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थी शेतकऱ्यांपर्यत प्रभावीपणे पोचविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप निर्माण करण्याची सूचना कृषी आयुक्तांनी यंत्रणांना केली आहे.

शुक्रवारी (ता. १७) कृषी आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार या ग्रुपमध्ये आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या गटांचे प्रमुख, कृषी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी, कृषिविषयक संस्थांचे पदाधिकारी, गावचे सरपंच, लोकप्रतिनिधींना प्राधान्याने अशा ग्रुपमध्ये घेण्याचे सांगितले आहे.

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हाॅट्सॲपसारखे प्रभावी माध्यम घराघरात पोचले आहे. याचा वापर करून काही अधिकारी चांगल्या प्रकारचे विस्ताराचे काम करीत आहेत. याचीच दखल घेत आता कृषी आयुक्तांनीही गावपातळीवर व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्याबाबत कृषी विभागाला सूचना केली आहे.

गावपातळीवर काम करणाऱ्या कृषी सहायकांनी गट बनविण्याची  त्यांनी सूचना केली आहे. प्रत्येक कृषी सहायकाने त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातील किमान 50 प्रगतिशील शेतकरी अशा ग्रुपद्वारे जोडावेत. ग्रुपची क्षमता लक्षात घेता किमान पाच गावांचा यामध्ये समावेश करावा. या ग्रुपचा वापर केवळ कृषिविषयक महत्त्वाच्या संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठीच केला जावा, असेही सांगितले आहे.

‘व्हाट्सॲप ग्रुप’ फायदेशीर काही जिल्ह्यांत कृषी सहायकांनी यापूर्वीच असे व्हाट्सॲप ग्रुप बनवित शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान, तंत्र पोचविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्‍यात कृषी सहायक विठ्ठल धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘आम्ही कांदा बिजोत्पादक'' हा ग्रुप बनविला आहे. या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून कांदा बिजोत्पादनासंदर्भात संपूर्ण माहिती, मार्गदर्शन या माध्यमातून तत्काळ दिले जाते. यामुळे मेहकर तालुक्‍यातील कांदा बिजोत्पादकांना उत्पादन वाढीसाठी मोठी मदत झाली.  शेतकरी आजही या ग्रुपमध्ये सक्रिय असून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT