Wet drought in Parbhani, Hingoli
Wet drought in Parbhani, Hingoli 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत गेल्या १० -१५ दिवसांहून अधिक कालावधीपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. ओढे, नाले, नदीकाठच्या जमिनी चिभडल्या आहेत.

अतिवृष्टी झालेल्या भागात जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतरस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतुकाचा प्रश्न गंभीर आहे. पाऊस थांबला नाहीतर नुकसानीच्या प्रमाणात आणखीन वाढ होऊ शकते. खरिप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. कृषी विभाग, विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी करुन पीकविमा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

दोन्ही जिल्ह्यात सोयाबीनसह तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर कपाशी, ज्वारी, उडीद, बाजरी, तीळ या पिकांचा क्रम लागतो. पावसाचा सर्वाधिक फटका काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन पिकाला बसला. शेंगांना झाडावरच मोड फुटले आहेत. कपाशीचे पीक वाकले आहे. काही बोंडे फुटून कापूस वेचणीस आला आहे. परंतु, पावसात भिजल्याने कापसातील सरकीला मोड फुटले आहेत. 

पाथरी, मानवत, सेलू , जिंतूर, औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी तालुक्यात अनेक मंडळांत सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २९ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहिला. 

पाथरी मंडळात मोठी पीकहानी झाली. शेत रस्त्यांची दुरवस्था आहे. कपाशीची वाढ खुंटली आहे. बोंडसड झाली आहे. उडीद, तीळ पिकाला मोड फुटले आहेत. ऊस आडवा झाला आहे. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करुन सर्वच पिकांच्या विमा परतावा द्यावा. विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.  - ज्ञानेश्वर काळे, शेतकरी, चाटे पिंपळगाव,जि.परभणी

गेल्या आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे विहिरी भरल्या आहेत. कपाशीचे पीक वाकले आहे. सोयाबीनला मोड फुटत आहेत. पीक हाती लागण्याची शक्यता कमीच आहे. - माणिकराव सुर्यवंशी, शेतकरी सिंगणापूर, जि.परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT