थंडी वाढू लागली
थंडी वाढू लागली 
मुख्य बातम्या

थंडी वाढू लागली

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा खाली उतरत आहे. यामुळे थंडीत वाढ होत असून बुधवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी येथे 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथील किमान तापमानात घट होऊ लागली आहे, त्यामुळे सायंकाळपासून हवेत गारवा तयार होत आहे. रात्री थंडीस सुरवात होत असून, पहाटे चांगलीच थंडी नागरिकांना हुडहुडी भरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सकाळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सध्या विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली असून, काही ठिकाणी किमान तापमान सरासरीएवढे होते. कोकणातही थंडी वाढू लागली आहे. पुणे परिसरातही आकाश अंशतः निरभ्र राहण्याची शक्‍यता आहे.

कोकणातील रत्नागिरी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली असून, किमान तापमान 18.3 अंश सेल्सिअस एवढे होते. ठाणे येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. तर मुंबई, अलिबाग, डहाणू, भिरा येथील किमान तापामानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घट झाली आहे. त्यामुळे कोकणातही हळूहळू थंडी जोर धरू लागली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर येथे सर्वांत कमी म्हणजेच 9.7 अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते चार अंश सेल्सिअसने घट झाली. तर कोल्हापूर, सांगली येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. महाबळेश्वर, मालेगाव येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले.

मराठवाड्यातील परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाच अंश सेल्सिअसने घट झाली. औरंगाबाद, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीएवढे होते, तर बीडमधील किमान तापानात किंचित घट झाली. विदर्भातील गोंदिया, नागपूर येथील किमान तापमानाचा पारा 11 अंशांपर्यंत खाली आला होता. तर नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी घटला होता. त्यामुळे अनेक भागांत थंडी हळूहळू जोर धरू लागली आहे.

बुधवारी (ता. 29) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअसमध्ये) मुंबई (सांताक्रूझ) 18.6 (-1), अलिबाग 19.0 (-1), रत्नागिरी 18.3 (-3), डहाणू 18.9 (-1), ठाणे 24.2, भिरा 17.5 (-1), नगर 9.7 (-4), पुणे 11.5 (-1), जळगाव 11.2 (-2), कोल्हापूर 16.4, महाबळेश्वर 14.4 (1), मालेगाव 13.6 (1), नाशिक 10.8 (-1), सांगली 15.6, सातारा 12.4 (-3), सोलापूर 12.5 (-4), औरंगाबाद 12.4, बीड 13.8 (-1), परभणी 9.6 (-5), नांदेड 15.0 (1), उस्मानाबाद 10.1, अकोला 15.0 (-1), अमरावती 14.8 (-2), बुलडाणा 15.2 (-1), चंद्रपूर 15.6 (1), गोंदिया 11.0 (-4), नागपूर 11.6 (-3), वर्धा 12.5 (-3), यवतमाळ 12.4 (-3)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT