संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात मुसळधारेचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्र संपून सूर्याचा आज (शनिवार) आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होणार आहे. यातच आजपासून (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाज असून, सतर्कतेसाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. 

यंदा मॉन्सूनचे आगमन खूपच लांबल्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला चांगल्या पावसाची ओढ लागली आहे. गुरुवारी (ता. २०) मॉन्सून कोकणात दाखल झाला, दक्षिण कोकणात पावसाने दणक्यात सुरवात केली. शुक्रवारी मॉन्सूनने प्रगती केली असली तरी उर्वरित राज्यात अद्याप तरी पावसाने जोर धरला नसल्याचे चित्र आहे. उद्यापर्यंत राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने तापमानातही घट होण्यास सुरवात झाली आहे. 

शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत : कृषी विभाग) ः कोकण : कोंडगाव २८, देवली २५, देवरूख ८८, सवंडल २१, कुंभवडे ३४, पाचल २३, भांबेड ३०, विलवडे २१, देवगड २८, पडेल ४९, मीतबंब ५२, मासुरी ३६, अंबेरी २४, पोइप २२, आजगाव २३, मदुरा ४९, शिरोडा २०. मध्य महाराष्ट्र : लामज १९, करंजे १२, खरसुंडी २५, शिरोळ १२, जयसिंगपूर १४, करंजफेन १५, कागल १२.विदर्भ : धाबा २२, तेमुर्डा २६, शेगाव ३९, चिकनी ५४, कोपर्णा २०, बल्लारपूर २४, पोंभुर्णा ५२, पाटण ४६, गडचिरोली २४, आरमोरी ३४, पिसेवढथा ४५, येनापूर २०, सिरोंचा २३, अल्लापाल्ली ३३, एटापल्ली ५४, मुरूमगाव ३८, चाटेगाव २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT