उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली
उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली 
मुख्य बातम्या

उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली

टीम अॅग्रोवन

पुणे : महाराष्ट्रात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. सोमवारपासून (ता.२३) राज्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, गुरुवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. रविवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस पावसाची नोंद झाली होती.  गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उन्हाचा चटका कायम असून, उर्वरित महाराष्ट्राच्या तापमानात वाढ झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणीसह विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. उद्यापासून महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्ये तापमानत वाढ होणार असून, तेलंगण, रायलसिमा, अांध्र प्रदेशात तापमान ४० अंशांच्या जवळपास राहील; तर शुक्रवारी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (ता.२२) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.५, नगर ४१.१, जळगाव ४१.०, कोल्हापूर ३८.९, महाबळेश्वर ३३.६, मालेगाव ४०.८, नाशिक ३७.३, सांगली ४०.८, सातारा ३९.६, सोलापूर ४२.१, मुंबई (सांतक्रूझ) ३३.७, अलिबाग ३२.२, रत्नागिरी ३४.७, डहाणू ३३.३, आैरंगाबाद ३९.१, परभणी ४२.९, अकोला ४२.६, अमरावती ४१.४, बुलडाणा ४२.८, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४१.०, नागपूर ४२.९, वर्धा ४२.९, यवतमाळ ४२.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT