वादळी वारे, गारपिटीची शक्यता वाढली
वादळी वारे, गारपिटीची शक्यता वाढली 
मुख्य बातम्या

वादळी वारे, गारपिटीची शक्यता वाढली

टीम अॅग्रोवन

पुणे : मालदीव परिसर ते अरबी समुद्र, कर्नाटक यादरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागांवर होणार आहे. येत्या शनिवार (ता. १०) ते सोमवार(ता. १२)दरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.  मध्य प्रदेशच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच कोकणातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बंगालचा उपसागर आणि श्रीलंका यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तरेकडील पंजाबच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे.  शनिवारी सायंकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे. रविवार (ता. ११) व सोमवारी (ता. १२) या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याच्या शक्यतेसह या वाऱ्याची तीव्रता अधिक असेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या दोन्ही दिवशी अधूनमधून वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.  मंगळवारी (ता. १३) वादळी वाऱ्याची तीव्रता कमी होईल, तर बुधवार(ता. १४ पासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीवर आलेल्या ज्वारीसारख्या पिकांची कापणी करून धान्य योग्यरीत्या साठवावे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनीदेखील शेतमालाची संरक्षितपणे साठवणूक करावी. नागरिकांनी वादळी वारे, विजा आणि गारपिटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  राज्यात आज (शुक्रवार) दिवसभर आकाश निरभ्र राहणार आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.मध्य महाराष्ट्रातील नगर येथे ९.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.  गुरुवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपयर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १८.२ (१), अलिबाग १९.८ (२), रत्नागिरी १८.१ (-१), भिरा १६.० (१), डहाणू १७.२, पुणे ११.५, नगर ९.८ (-३), जळगाव १३.०, कोल्हापूर १६.० (१), महाबळेश्वर १२.५ (-१), मालेगाव १५.२ (४), नाशिक १२.४ (२), निफाड १०.६, सांगली १४.९, सातारा ११.४ (-२), सोलापूर १४.५ (-३), औरंगाबाद १३.५ (१), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १०.५, परभणी शहर १३.४(-२), नांदेड १४.० (-१), उस्मानाबाद १०.८, अकोला १५.५,  अमरावती २०.२ (४), बुलडाणा १५.२ (-१), चंद्रपूर १५.४ (-१), गोंदिया १५.२, नागपूर १४.३, वर्धा १४.२, यवतमाळ १८.४ (२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT