जायकवाडीसाठी पाणी उद्या सोडणार
जायकवाडीसाठी पाणी उद्या सोडणार 
मुख्य बातम्या

जायकवाडीसाठी पाणी उद्या सोडणार

टीम अॅग्रोवन

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी (ता. २९) नाशिक जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटप करण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी मंगळवारी (ता. २३) दिले.

या आदेशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली तसेच उच्च न्यायालयातही या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. तथापि, न्यायालयाने दिवाळीनंतर त्यावर सुनावणी करण्याचा निर्णय दिल्यामुळे आता पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे पाटबंधारे महामंडळाने पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

धरणातून पाणी सोडण्यापूर्वी धरणावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, त्यासाठी पोलिस खात्याला पत्र देण्यात आले आहे. तर नदीच्या दुतर्फा पाण्याची चोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज कंपनीलाही विनंती करण्यात आली असून, नदीपात्रात असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचे निडल्स काढले जात आहेत. भावली, भाम या धरणांतून दारणात पाणी सोडण्यात येत आहे. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर साधारणत: सोमवारी (ता. २९) जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली.

विसर्गाचे चित्रीकरण ‘जायकवाडी’साठी पाणी सोडण्यापूर्वी आणि प्रवाह चालू असतानाचे चित्रीकरण, छायाचित्रण करण्याचे तसेच फोटो व चित्रीकरणावर वेळ, तारखेचा शिक्का असावा, त्यात कोणत्याही प्रकारचे एडिटिंग करू नये, अशाही सूचना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. प्र. कोहिरकर यांनी दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT