विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा  Warning of heavy rains in sparse places in Vidarbha
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा  Warning of heavy rains in sparse places in Vidarbha 
मुख्य बातम्या

विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे.  बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत आहे. आज ही प्रणाली निवळण्याची शक्यता असली, तरी तिच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य भारतातून उत्तर प्रदेश राज्याकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे आंध्र प्रदेशचा किनारा छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.  दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र आज विरून जाणार आहे. या प्रणालीमुळे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्यांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)  विदर्भ : अकोला, चंद्रपूर. 

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर. 

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर. 

विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT