तूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
तूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

तूर खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : तूर खरेदीचा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अद्याप केंद्र सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. खरेदी विक्री संघाचा पाच कोटी रुपयांचा आनुषंगिक खर्च थकीत आहे. यावर निर्णय न झाल्याने खरेदी विक्री संघ तूर खरेदीच्या मूडमध्ये दिसत नसल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी जानेवारीमध्ये तूर खरेदी सुरू झाली होती, शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी फेब्रुवारी महिन्यात आणली. यंदा मात्र, अद्याप कुठलेही नियोजन नाही. संघांने केलेला आनुषंगिक खर्च जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिला नाही. त्यामुळे यंदा 'आधी रक्कम द्या, नंतरच खरेदीचे पाहू' असे धोरण संघाने घेतले आहे. त्यामुळे जानेवारी अर्ध्यावर आल्यानंतरही केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय झाला नाही. तूर खरेदी करताना हमाली, बारदाने शिलाई पैसे, कमिशन आदींची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे.

संघाने दोन वर्षे सांभाळून घेतले. परंतु, आता खरेदी शक्‍य नसल्याचे संघांच्या संचालकांचे म्हणणे आहे. थकबाकीतील रक्कम द्या, त्यानंतर विचार करू, अशी त्यांची भूमिका आहे. यावर निर्णय घेण्यासाठी येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील सर्व खरेदी विक्री सभापतींची बैठक होणार आहे. त्यानंतरच पुढील रणनीती ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT