Visit of Commissioner of Agriculture to Grape Terrace Garden 
मुख्य बातम्या

द्राक्ष टेरेस गार्डनला कृषी आयुक्तांची भेट

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील भाऊसाहेब कांचन यांनी आपल्या घराच्या टेरेसवर फुलवलेल्या द्राक्ष बागेची पाहणी राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी शनिवारी (ता.२९) केली.

टीम अॅग्रोवन

पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील भाऊसाहेब कांचन यांनी आपल्या घराच्या टेरेसवर फुलवलेल्या द्राक्ष बागेची पाहणी राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी शनिवारी (ता.२९) केली. 

यावेळी राज्याचे कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, माजी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी सुरेश सातव, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, डॉ. उल्हास सुर्वे, ज्ञानदेव देशमुख, गुलाब कडलग, पुरुषोत्तम काकडे, राजेंद्र भोसेकर आदी उपस्थित होते.  

कृषी आयुक्त धीरजकुमार म्हणाले की, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब कांचन यांनी टेरेसवर फुलवलेली द्राक्ष बागेचा प्रयोग ही एक चांगली कल्पना आहे. प्रेरणा, प्रोत्साहन देणारा आहे. असे प्रयोग केल्यास फायदा होईल. त्यासाठी कृषी विभागाकडून मदत करता येईल. त्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.  

कृषी आयुक्तांच्या विविध ठिकाणी भेटी  राज्याचे कृषी आयुक्त यांनी सुटीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या प्रयोगांना भेटी देत आहेत. त्याचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे. कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी उरुळी कांचन येथील महेश लोंढे यांनी सुरू केलेल्या न्यू मिलेट्स प्रक्रिया उद्योग, भवरापूर येथील सुभाष साठे यांनी सुरू केलेल्या मुधमका प्रक्रिया व निर्यात प्रकल्प, सिरसवडी येथील संतोष गोते यांच्या भुईमूग तेल प्रकल्पास भेटी देऊन प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेत कृषी विभागामार्फत मदत करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam: उजनीतून ९० हजार क्युसेक विसर्ग

POS Device: खतविक्रीसाठी नवे पॉस मशिन बंधनकारक

Monsoon Rain Update: ताम्हिणी घाटात ‘रेकॉर्ड ब्रेक’ ५७५ मिमी पावसाची नोंद

Papaya Price: खानदेशात पपईचे दर १२ ते २० रुपये किलो

Farmer Support: शासन अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी :भरणे

SCROLL FOR NEXT