व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुख
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुख 
मुख्य बातम्या

व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुख

वृत्तसेवा

नवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे संरक्षण मंत्रालयाने शनिवारी (ता.२३)जाहीर केले. विद्यमान नौदलप्रमुख ॲडमिरल सुनील लांबा हे ३० मे रोजी निवृत्त होत असून, ते करमबीर यांच्याकडे सूत्रे सोपवतील. ही नियुक्ती करताना पारंपरिक सेवा ज्येष्ठतेचा निकष न लावता सद्यपरिस्थितीत आवश्‍यक असलेल्या गुणांच्या जोरावर निवड केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह हे सध्या विशाखापट्टणम येथे नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख आहेत. करमबीर हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) विद्यार्थी आहेत. ते जुलै १९८० मध्ये नौदलात दाखल झाले होते. १९८२ मध्ये नौदलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी चेतक आणि कामोव्ह हेलिकॉप्टरमधून अनेक उड्डाणे केली आहेत. नौदलाचे नेतृत्व करणारे ते कदाचित पहिलेच वैमानिक ठरतील, असे एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले. त्यांना आतापर्यंत उत्कृष्ट सेवेसाठी परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तटरक्षक दलाची नौका चांदबीबी, आयएनएस विजयदुर्ग, आयएनएस राणा आणि आयएनएस दिल्ली या नौकांचे नेतृत्व केले आहे. व्हाइस ॲडमिरल विमल वर्मा हे करमबीरसिंह यांच्यापेक्षा वरिष्ठ असून ते नौदलप्रमुख पदाच्या शर्यतीत होते. वर्मा यांच्यासह नौदल उपप्रमुख व्हाइस ऍडमिरल जी. अशोक कुमार, व्हाइस ऍडमिरल अजितकुमार आणि व्हाइस ऍडमिरल अनिलकुमार चावला यांची नावेही पदासाठी चर्चेत होती. २०१६ मध्ये लष्करप्रमुखांची निवड करतानाही ज्येष्ठतेचा निकष लावण्यात आला नव्हता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT