कापूस बियाणे
कापूस बियाणे  
मुख्य बातम्या

बीटी बियाणे दर, रॉयल्टीत कपात

वृत्तसेवा

नवी दिल्ली: केंद्राने कापसाच्या जणुकीय सुधारित (जीएम) बीटी बियाण्याच्या कमाल विक्री दरात १० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०१९-२० च्या खरिपात शेतकऱ्यांना बीटी बियाण्याचे पाकीट (४५० ग्रॅम) ७३० रुपयांना मिळणार आहे. तसेच मोन्सॅंटो कंपनीला प्रतिपाकीट रॉयल्टीपोटी (स्वामित्व शुल्क) मिळणाऱ्या शुल्कातही जवळपास ५० टक्के कपात करून ३९ रुपयांवरून २० रुपये केले आहे.  केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाने देशातील जवळपास ८० लाख कापूस उत्पादकांना आणि मोन्सॅंटोचे तंत्रज्ञान वापरून बीटी बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळाला. मात्र, मोन्सॅंटो कंपनीने केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘देशभरात भारत सरकारने ट्रेट व्हॅल्यू (तंत्रज्ञान वापर शुल्क) कपात करण्याचा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. आधीच ट्रेट व्हॅल्यू शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या ०.५ टक्क्यांपेक्षाही कमी होती, त्यात आणखी कपात करण्यात आली आहे. भविष्यात भारतीय कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी गुंतवणूक आणि नवतंत्रज्ञान आकर्षित करण्यासाठी न्यायसंगत आणि सुसंगत व्यापाराचे वातावरण असणे आवश्‍यक आहे,’’ असे मोन्सॅंटो कंपनीच्या प्रतिनिधीने म्हटले. बीजी-१ तंत्रज्ञानासाठी ६३५ रुपये प्रतिपाकीट कमाल विक्री दर ट्रेट व्हॅल्यूशिवाय कायम ठेवला आहे. मार्च २०१६ पासून केंद्र सरकाराने ‘जीएम’ बियाणेसहीत कापूस बियाणे दरावर नियंत्रण ठेवण्यास सुरवात केली.  सलग तिसऱ्या वर्षी दरकपात केंद्रीय कृषी मंत्रालयाने सलग तिसऱ्या वर्षी बीटी बियाणे दर आणि रॉयल्टीमध्ये कपात केली आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २०१९-२० वर्षासाठी बोलगार्ड-२ (बीजी)च्या बीटी बियाणे पाकिटाचे (४५० ग्रॅम) कमाल विक्री दर २० रुपये रॉयल्टीसह ७३० रुपये ठरविण्यात आले आहेत. २०१८-१९ मध्ये बियाणे पाकिटाचे दर ७४० रुपये होते आणि रॉयल्टी प्रतिपाकीट ३९ रुपये होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT