नाशिक : ‘‘पीपीआर, घटसर्प, लाळ्या खुरकूत लसीकरणामुळे शेळ्या रोगांना बळी पडत नाहीत. म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात लसीकरण करून घ्यावे. नवीन शेळ्या विकत आणल्यावर लगेचच पीपीआर या रोगाचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. शेळीपालनात लसीकरण व दर तीन महिन्यांनी जंतनिर्मूलन यास अनन्य साधारण महत्त्व आहे’’, असे प्रतिपादन मालेगाव कृषि विज्ञान केंद्राच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र मालेगाव, कृषि विभाग आणि ‘आत्मा’ नाशिकतर्फे देवळा येथे गुरुवारी (ता.१५) महिला किसान दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप नेरकर यांनी बंदिस्त शेळी पालनाबाबत मार्गदर्शन केले.
नेरकर म्हणाले, ‘‘बंदिस्त शेळीपालनात आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक शेळीस रोज २ ते ३ किलो कोरडा चार किंवा कुट्टी व २ ते ३ किलो हिरवा चारा, सोबतच २००-२५० गरम भरड खाद्य देणे गरजेचे आहे. ’’
किरण यादव यांनी बचत गटातून महिलांचा विकास यासंबंधी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘परिसरातील मूग, उडीद व कुलथी या अन्नधान्याची विक्री लहान १० किलो वजनाच्या पिशव्या बांधून समूह गट पद्धतीने विक्री केल्यास अधिक नफा मिळू शकेल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.