सोयाबीनवरील कीडनियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरा
सोयाबीनवरील कीडनियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरा 
मुख्य बातम्या

सोयाबीनवरील कीडनियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरा

टीम अॅग्रोवन

अकोला ः तालुका कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने मौजे सुकळी (नंदापूर) येथे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची शेतीशाळा घेण्यात आली.

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ प्रा. कुलदीप देशमुख यांनी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन, किडीची व रोगांची ओळख, निंबोळी अर्काची फवारणी, त्यावरील उपाय योजना, फेरोमोन सापळे लावल्यामुळे होणारे फायदे, या विषयी प्रात्यक्षिक करून तांत्रिक मार्गदर्शन केले. 

त्यानंतर आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांनी कीडनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, आंतरमशागत व पीक व्यवस्थापन, फुलोरा अवस्थेमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. 

सोयाबीन पिकाच्या शेतीशाळेमध्ये उपस्थिती म्हणून सरपंच शिल्पा साखरे, पोलिस पाटील विठ्ठल महल्ले, कृषी सहायक बालकृष्ण खंडारे यांची प्रामुख्याने उपस्थित होती. या वेळी शेतीशाळेमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतीशाळा यशस्वी होण्यासाठी शेतकरी मित्र नितीन सारसे यांनी सहकार्य केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT