Use integrated control system for ‘Lumpy Skin’: Dr. Bhikane 
मुख्य बातम्या

‘लंम्पी स्कीन’साठी एकात्मिक नियंत्रण पध्दत वापरा : डॉ. भिकाने

औरंगाबाद : ‘‘लंम्पी स्कीन’ आजारावर विशेष लस उपलब्ध नाही. त्यामुळे सुरवातीपासूनच एकात्मिक नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे,’’ असा सल्ला स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी शेतकऱ्यांना दिला.

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘‘लंम्पी स्कीन’ आजारावर विशेष लस उपलब्ध नाही. त्यामुळे सुरवातीपासूनच एकात्मिक नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे,’’ असा सल्ला स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी शेतकऱ्यांना दिला.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोलातर्फे बुधवारी (ता.९) आयोजित ‘लंम्पी स्कीन आजार : काळजी व उपाययोजना’ ही राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्ष्यस्थानी कुलगुरु डॉ. अशोक ढवण  होते. अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, एनएआरपी, औरंगाबादचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, डॉ. दिगंबर कांबळे, केव्हिके औरंगाबाद-१ चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे आदी उपस्थित होते. 

डॉ. भिकाने म्हणाले, ‘‘लंम्पी स्कीन हा पशुधनातील अत्यंत महत्वाचा आजार आहे. विषाणूमुळे हा आजार होतो. उष्ण व दमट हवामान या रोगास पोषक असते. हा आजार पावसाळ्यात अधिक प्रमाणात होतो. त्याचा प्रसार किटकांमुळे होतो. सुरवातीला जनावरांना भरपूर ताप येणे, डोळयातून, नाकातून स्त्राव येणे, पाणी पिणे कमी, बंद करणे, डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येणे ही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. या आजारामध्ये जनावरांच्या त्वचेवर १० ते २० मि.मी व्यासाच्या गाठी येतात.’’ 

आजाराचा प्रसार किटकांच्या मार्फत होत असल्याने गोठा तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. कीटकांचे नियंत्रण करावे. बाधित जनावरांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन ठेवावे.  पशूतज्ज्ञांच्या सल्याने प्रतिजैविके, ज्वरनाशके, ॲन्टीहिस्टेमिनीक औषधे, प्रतिकारशक्ती वर्धक जीवनसत्वे ‘अ’ व ‘ई’, ॲन्टीसेप्टिक औषधे/ प्लाय रिपेलंट स्प्रे वापर, प्लेमगन यांचा वापर करुन त्यावर नियंत्रण मिळवता येते. या आजारात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यामुळे पशुपालकांनी योग्य उपाययोजना कराव्यात’’, असे आवाहन डॉ. भिकाने यांनी केले. 

डॉ. ढवण म्हणाले, ‘‘या रोगाबाबत संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. विद्यापीठातर्फे मार्गदर्शनासह जनजागृती करण्यात येत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT