युरिया
युरिया  
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात युरियावर लिंकिंग, तुटवड्याने शेतकऱ्यांची पिळवणूक

टीम अॅग्रोवन

जळगाव ः जिल्ह्यात युरियासोबत १०.२६.२६ या खताची दोन कंपन्यांकडून सर्रास लिंकिंग सुरू आहे. यामुळे खत विक्रेते, शेतकरी यांची वित्तीय पिळवणूक होत असून, या दोन्ही कंपन्यांवर कारवाईसंबंधी मागणी केली जात आहे.  या दोन्ही कंपन्यांची नावे खत विक्रेते जाहीरपणे सांगण्यास नकार देत आहेत. कारण कंपन्यांची नावे जाहीर केली तर युरिया मिळणे कठीण होईल. युरियाचा अधिकाधिक पुरवठा या दोन कंपन्यांकडून केला जातो. मागील काही दिवसांमध्ये या दोन्ही कंपन्यांनी सुमारे साडेसात हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळून केला आहे. ज्या खत वितरकांनी आपल्याकडून १०.२६.२६ घेतले, त्यांनाच या युरियाची विक्री केली आहे. यातच या दोन्ही कंपन्यांच्या १०.२६.२६ खताचे दर इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक आहेत. इतर कंपन्यांची १०.२६.२६ ची एक ५० किलोची गोणी १२०० रुपयाला मिळते. परंतु या दोन्ही कंपन्या एका गोणीमागे ६५ रुपये जादा दर आकारतात. ३०० गोण्या युरिया हवा असेल तर १०० गोण्या १०.२६.२६ घ्या, असा लिंकिंगचा व्यवहार या कंपन्या सर्रास करीत आहेत, अशी तक्रार एका विक्रेत्याने ॲग्रोवनकडे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

एका कंपनीने पोटॅश व  १५.१५.१५ची केली सक्ती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यंतरी १५ दिवस युरियाचा पुरवठाच बंद होता. एका कंपनीने या दरम्यान आपल्याकडील युरिया वितरकांना देताना १५.१५.१५ व पोटॅश खत घेण्याची सक्ती केल्याची माहिती मिळाली. युरियाचा किरकोळ तुटवडा मध्यंतरी होता, परंतु कुणाकडूनही या संदर्भात ठोस किंवा लेखी तक्रार केली नाही. मागील पाच-सात दिवसांत जिल्ह्यात नर्मदा व कृभको या कंपन्यांनी मिळून सुमारे साडेतीन हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा केल्याची माहिती मिळाली.  किरकोळ बाजारात शेतकऱ्यांची लूट ग्रामीण भागात किंवा मोठ्या गावातील बाजारात युरिया खतावर महिनाभरापासून लिंकिंग सुरू आहे. सहा गोण्या युरियावर दोन गोण्या १०.२६.२६ घेण्याची सक्ती अनेक भागांत विक्रेते शेतकऱ्यांना करीत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांची ही लूट होत असली तरी कृषी विभागाने अद्याप या संदर्भात एकही कारवाई केलेली नाही. कंपनीलाही जाब विचारलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT