महाराजस्व अभियानांतर्गत २२ शिव, शिवार रस्ते झाले खुले Under Maharajaswa Abhiyan 22 Shiva, Shivar roads opened
महाराजस्व अभियानांतर्गत २२ शिव, शिवार रस्ते झाले खुले Under Maharajaswa Abhiyan 22 Shiva, Shivar roads opened 
मुख्य बातम्या

महाराजस्व अभियानांतर्गत २२ शिव, शिवार रस्ते झाले खुले

टीम अॅग्रोवन

वणी, ता. दिंडोरी : अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते-शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम दिंडोरी तालुका महसूल प्रशासनाने राबवीत एकाच दिवशी २२ शिव व शिवार रस्ते खुले करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिंडोरी तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या साहाय्याने तहसीलदार पंकज पवार यांनी कालबद्ध नियोजन करून तालुक्यातील एकूण २२ गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पाणंद पांदणा शेतरस्ते, शिवार-शिव रस्ते मोकळे केलेले आहे. या करिता नायब तहसीलदार संघमित्रा बावीस्कर, अव्वल कारकून बाहीकर आणि महसूल सहायक मोहन नांद्रे यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार केला.

तालुक्यातील लोकांच्या सहभागातून आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून घेऊन तालुक्यातील संबंधित गावचे गावकरी व शेतकरी यांचे उपस्थित पंचनामा करून ताबापावती करून हे रस्ते ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. एकूण १४ कि.मी. लांबीचे २२ रस्ते खुले करण्यात आले. याचा ९२१ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ झाल्याने शेतकरी व नागरिकांनी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांचे आभार मानले. मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे शिवरस्ते, पाणंद रस्ते लोकसहभागातून मोकळे करण्याची धडक मोहीम दिंडोरी तालुक्यात हाती घेतली आहे. महाराजस्व अभियान सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचल्याचे समाधान आहे. -पंकज पवार, तहसीलदार-दिंडोरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT