page
page  
मुख्य बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार अतिवृष्टीग्रस्त भागांच्या दौऱ्यावर 

टीम अॅग्रोवन

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (ता.१९) सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून (ता.१८) दोन दिवस मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी १०:४५ वाजता सांगवी खुर्द येथे नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते ११:०० वाजता बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी करतील. ११:३० वाजता अक्कलकोट शहर येथे हत्ती तलावाची पाहणी, त्यानंतर दुपारी १२ वाजता रामपूर अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दुपारी १२:३० वाजता बोरी उमरगे येथे आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, दुपारी ३ वाजता पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी घेणार आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शरद पवार शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. आज (ता.१८)  सकाळी खासदार पवार हे बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत. रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा तुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT