Twelve thousand crore square feet of FRP in two weeks
Twelve thousand crore square feet of FRP in two weeks 
मुख्य बातम्या

दोन आठवड्यांत ‘एफआरपी’चे सव्वादोन हजार कोटी वर्ग

टीम अॅग्रोवन

पुणे : साखरेला कमी भाव व निर्यातीत अनेक समस्या असूनही राज्यातील साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ वाटप चालू ठेवले आहे. गेल्या दोन आठवड्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात सव्वादोन हजार कोटी रुपये वर्ग केले आहेत.

राज्यात यंदा १८७ साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला आहे. अनेक कारखान्यांची धुराडी आता बंद होत आहेत. आतापर्यंत ७४४.६२ लाख टन ऊस गाळप झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १४१ कारखान्यांनी ४०६ लाख टनांचे गाळप केले आहे. यंदा गाळपाचे प्रमाण दुपटीने वाढल्याने एफआरपी वाटपात देखील जवळपास पाच हजार कोटीने वाढ झालेली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी १६ हजार २७५ कोटी रुपयांचा ऊस विकला आहे.

मात्र त्यापोटी अदा केलेली एफआरपी १३ हजार ९१७ कोटी रुपयांची आहे. समस्या असूनही कारखान्यांनी गेल्या १५ दिवसांत दोन हजार २८७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली.

राज्यात आतापर्यंत १०० टक्के एफआरपी वाटणाऱ्या कारखान्यांची संख्या आतापर्यंत ७४ पर्यंत आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पूर्ण एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या ७० होती. तसेच थकीत एफआरपीची रक्कम एक हजार १६९ कोटीची होती. लॉकडाउन, निर्यातीमधील अडचणी, साखरेला कमी भाव अशा अनेक समस्या असतानाही कारखान्यांकडून एफआरपीचे वाटप समाधानकारकपणे सुरू आहे.

कोणत्याही कारखान्याला आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) कारवाईला सामोरे जावे लागले नाही. मात्र वेळेत एफआरपी न देणाऱ्या सर्व कारखान्यांवर साखर आयुक्तालय लक्ष ठेवून आहे, असे साखर कारखाना उद्योगातून सांगण्यात आले.

कायद्यानुसार एफआरपी द्यावीच लागते. मात्र त्यासाठी कारखान्यांना कर्ज काढावे लागत आहे. कर्जाचा टेकू वारंवार घेणे हे चांगले लक्षण नाही. त्यामुळे कारखाने सक्षम होण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. - पांडुरंग रामराव पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना (सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT