tur
tur  
मुख्य बातम्या

बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिरावले 

टीम अॅग्रोवन

अकोला ः यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले. शिवाय तुरीची मागणी वाढल्याने सुरुवातीला दरही चांगले मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांत तुरीचे दर स्थिरावल्यासारखे दिसत आहे. सध्या तुरीचा भाव सरासरी साडेसहा हजारांदरम्यान टिकून आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनचा परिणाम बाजारावर मोठ्या प्रमाणात होत आहे. काही बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद तर काही ठिकाणी अर्धा दिवस सुरू, अशा प्रकारे व्यवहारांची स्थिती आहे. 

पश्‍चिम विदर्भात अकोल्याची बाजारपेठ तुरीच्या दर व आवकेसाठी महत्त्वाची आहे. २५ एप्रिलपासून या बाजार समितीत तुरीच्या दरांचा ट्रेंड बघितला असता २६ व २८ एप्रिलला सरासरी दर ६८०० पर्यंत मिळाला. कमीत कमी ६२०० व जास्तीत जास्त ७००० रुपये दर याकाळात होता. नंतर मात्र, दरांमध्ये थोडीफार घसरण होत गेली. मंगळवारी (ता. ४) तूर ६६५० रुपये क्विंटल विकल्या गेली. या भागातील इतर बाजार समित्यांमध्ये जवळपास असाच दर मिळाला. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कोराना निर्बंधामुळे बाजार समित्यांमध्ये दरांवर परिणाम दिसून येत आहे. यामुळे दरात १५० ते २०० रुपये तूर पाहायला मिळत आहे.  आगामी हंगाम लक्षात घेता तुरीची आवक बऱ्यापैकी सुरू आहे. अकोल्यात सहाशे पोत्यांवर आवक झाली होती. तर वाशीम बाजारात ३११२ पोत्यांची आवक होती. दर या बाजार समितीत तुरीचा दर ६३०० ते ६८०० रुपये मिळाला. बाजार समित्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध पाळत व्यवहार सुरू ठेवण्यावर प्रशासन जोर देत आहेत. मात्र त्यांनाही अनेक अडथळे येत आहेत. 

परिस्थिती सुधारल्यास लाभ  मागणी कमी झाल्याने तसेच लॉकडाउन निर्बंधांमुळे तुरीच्या दरात तूट आलेली आहे. येणाऱ्या काळात हे दर कधी तेजीत येतील हे सध्या सांगता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. कोरोनाचे निर्बंध सैल झाल्यानंतर काय परिस्थिती राहते त्यावर कदाचित पुढील अंदाज देता येणे शक्य होईल, अशा स्वरूपाच्या सावध प्रतिक्रिया बाजारात मिळाल्या.  प्रतिक्रिया  खामगाव (जि. बुलडाणा) बाजारात तुरीला दर ६२०० ते ६७०० पर्यंत मिळत आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर हे दर खाली आलेले आहेत. तुरीला सध्या उठाव नाही. लॉकडाउन असल्याने लग्न समारंभ, मोठे कार्यक्रम बंद आहेत. तसेच आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तुरीचा उठाव नाही. कालपेक्षा आजच्या बाजारात १०० रुपयांनी भाव खाली आहे.  - अविनाश सोनटक्के, अडत दुकानदार, खामगाव, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

Commodity Market : हळद, मुगाचे भाव वधारले

SCROLL FOR NEXT