फ्युचर्स किमतीः सप्ताह- २७ एप्रिल ते ३ मे, २०२४
या महिन्यात NCDEX मध्ये मक्याचे मे, जून व जुलै डिलीवरीसाठी व हळदीचे जून, ऑगस्ट व ऑक्टोबर डिलीवरीसाठी व्यवहार चालू असतील. MCX मध्ये कापसाचे मे, जुलै व सप्टेंबर डिलीवरीसाठी तर कपाशीचे नोव्हेंबर, फेब्रुवारी (२०२५) व एप्रिल (२०२५) डिलीवरीसाठी व्यवहार करता येतील.
३ मे रोजी संपलेल्या सप्ताहात हळद व मूग वगळता सर्व वस्तुंचे भाव उतरले. तुरीच्या किमती अजूनही रु. १०,००० च्या वर आहेत. हळदीतील तेजी टिकून आहे. या वर्षी हळदीची आवक कमी आहे. उत्पादनातील घट व किमती वाढण्याची अपेक्षा यामुळे आवक कमी झाली आहे. हळदीतील तेजीचा फायदा वायदेबाजारात उतरून घेता येईल. सर्वच वस्तुंची आवक कमी होत आहे. किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ५८,२४० वर आले होते. या सप्ताहात ते १.६ टक्क्यांनी घसरून रु. ५७,३०० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव २.६ टक्क्यानी घसरून रु. ५८,९६० वर आले आहेत. सप्टेंबर फ्युचर्स भाव रु. ६१,८०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.९ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक कमी होत आहे.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी घसरून रु. १,४४५ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,४५० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात १.४ टक्क्यानी घसरून रु. २,०५० वर आले आहेत. फ्युचर्स (जून) किमती १.६ टक्क्यांनी घसरून रु. २,०७० वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,०८१ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.५ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा कमी आहेत. मक्याची आवक कमी होत आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १७,६८७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.४ टक्क्यानी वाढून रु. १७,७५० वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती रु. १८,८३२ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १९,३५६ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ९ टक्क्यांनी जास्त आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.२ टक्क्यानी वाढून रु. ६,१५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,१०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) रु. ९,००० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,६९७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,६०० वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १०,५२४ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,३५१ होती; या सप्ताहात ती रु. १,४८४ वर आली आहे. गेल्या तीन महिन्यात कांद्याची आवक स्थिर आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ९१७ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.