बॅंकेकडून नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा प्रयत्न
बॅंकेकडून नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा प्रयत्न 
मुख्य बातम्या

नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा प्रयत्न

टीम अॅग्रोवन

नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. त्यातून कर्जवसुली करण्याचे बॅँकेचे प्रयत्न आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन्ही कारखान्यांसाठी चार खासगी कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पाच ते सहा कोटी रुपये अनामत भरण्यास या कंपन्यांनी असमर्थता व्यक्त केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक सहकारी कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे १५७, तर निफाड सहकारी कारखान्याकडे १२५ कोटी रुपयांचे कर्ज अनेक वर्षांपासून थकले आहे. कर्जबाजारीपणा, खेळत्या भांडवलाचा अभाव, कर्मचाऱ्यांची देणी, यामुळे आर्थिकदृष्ट्या जर्जर झालेले हे दोन्ही कारखाने बंद पडून जिल्हा बँकेने थकबाकीपोटी जप्त केले आहेत. त्यामुळे कारखान्याकडे असलेल्या थकबाकीवर चक्रवाढ व्याजाचा डोंगर दिवसागणिक वाढत चालला आहे. शिवाय कारखाना सुरू करण्यासाठी करण्यात आलेले राजकीय व शासकीय प्रयत्नही अनेकवेळा फसल्यामुळे बँकेने कारखाना विक्री करण्यासाठी वेळोवेळी जाहिराती काढल्या, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. शासनानेच सहकारी साखर कारखाने विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे बॅँकेने विक्रीचा निर्णय बदलून भाडेतत्त्वावर चालविण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT