शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा ः आमदार चिखलीकर
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा ः आमदार चिखलीकर 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा ः आमदार चिखलीकर

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील सरपंच, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांनी प्रकल्पाची अमंलबजावणी व्यवस्थित करावी. आपआपल्या गावातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

हवामान बदलानुरूप जुळवून घेत लहान शेतकऱ्यांना सक्षम करून शेती व्‍यवसाय किफायतशीर करण्‍याच्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्पांअतंर्गत नांदेड जिल्ह्यात प्रथम टप्प्‍यात ७० गावांत प्रकल्‍प राबविण्‍यास सुरवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्‍यात निवड झालेल्या २१५ गावांतील सरपंच, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांच्यासाठी सोमवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेचे उद्‍घाटन आमदार चिखलीकर यांच्या हस्ते झाले. 

जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, यशदा तज्ज्ञ जयदेव राजंनकर, राजेश भटकर, प्रकल्प विशेषज्ञ एस. व्ही. आकोलकर आदी उपस्थित होते. श्री. डोंगरे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या व्यवस्थित अंमलबजावणीचे निर्देश दिले. 

श्री. रांजनकर आणि भटकर यांनी ग्राम संजीवनी समित्यांची स्थापना, भूमिका, जबाबदारी आणि वैयक्तिक घटकांना लाभ देण्याच्या कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. प्रास्ताविकात श्री. चलवदे यांनी प्रकल्पांची रूपरेषा, ग्राम संजीवन समित्यांची रचना, जबाबदाऱ्या, कार्य, प्रकल्पाची कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. 

यावेळी पाच शेतकरी गटांना गट शेती प्रोत्साहन योजनेअंतर्गंत मंजुरी पत्र जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते देण्यात आले. कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे यांनी केले. कार्यशाळेस उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका अधिकारी, सरपंच, कृषी सहायक, पर्यवेक्षक, ग्रामसेवक उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT