जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना आदिवासी बांधव.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना आदिवासी बांधव. 
मुख्य बातम्या

आदिवासी बांधवांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मोर्चेकऱ्यांमध्ये रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने आदिवासी बांधवांनी शुक्रवारीही (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले.  आदिवासी बांधवांचा प्रचंड जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसला होता. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वामध्ये गुरुवारी शहरातील श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून वनहक्क कायद्यासंबंधी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात सुमारे दोन हजार आदिवासी बांधव, महिला सहभागी झाले. हा मोर्चा गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक पोचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी जोपर्यंत आपल्याकडे रस्त्यावर येऊन निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका मांडली. जिल्हाधिकारी गुरुवारी सायंकाळपर्यंत कुठल्याशा कामानिमित्त कार्यालयाबाहेर होते. ते सायंकाळी कार्यालयात परतले. परंतु शिष्टाचार मोडून मोर्चेकऱ्यांमध्ये निवेदन स्वीकारायला जिल्हाधिकारी राजेनिंबाळकर गेले नाहीत. रात्री ९.४५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन स्वीकारायला बसले होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिदेचे अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, वन विभागाचे अधिकारी आदी होते; पण जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला आपल्याकडे न आल्याने मुख्य रस्त्यावर मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या मांडला. गुरुवारी रात्रभर अनेक मोर्चेकरी कार्यालयाबाहेर बसून होते. नंतर शुक्रवारीही हे आंदोलन सुरूच राहिले. मोर्चेकरी मुख्य रस्त्यावर बसल्याने वाहतूक जवळपास बंद झाली. वातावरण तणावाचे बनले. मोर्चेकऱ्यांनी लढेंगे, जितेंगे..., आमू आखा एक से..., अशी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारांनजीक पोलिस बळ नियुक्त करण्यात आले होते. तसेच बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून रोखण्यात आले. या सगळ्या वातावरणात गोंधळ आणि लोटालोटीही सुरू झाली. दुपारपर्यंत अशी स्थिती होती. मोर्चात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी आदी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT