राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदार
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदार 
मुख्य बातम्या

राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदार

टीम अॅग्रोवन

सातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे धावडशी... तीन वर्षांपूर्वी टॅंकरने पाणी पिण्याचीही वेळ ठेपलेली... मेरुलिंग डोंगर उताराची जमीन म्हणजे कुसळांचं आलेले भरभरून पीक... पण, जलयुक्‍त शिवार अभियानातून २०१६-१७ मध्ये कायापालटची सुरवात झाली... गावात चक्‍क डोंगरपायथ्यांच्या विहिरीही तुडुंब भरल्या, तर कुसळं गेली अन्‌ हळद, आले, ऊस ही नगदी पिके आली. चक्‍क जलसंधारणाच्या कामातून बाणेदार लक्ष्मीबाईंचे धावडशी आता पाणीदार बनले.  साताऱ्यापासून १५ किलोमीटर अंतरावर हे धावडशी गाव मेरुलिंगच्या डोंगर कपारीत वसलेले आहे. येथील श्री ब्रह्मेंद्रस्वामी मंदिराजवळची तळी ही न अटणारे जलस्त्रोत आहेत. १९७२ च्या दुष्काळातही ही तीन तळी भरलेली होती. मात्र, दुसरीकडे डोंगरावर पडणारा पाऊस वाहून जात असल्याने नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच या गावाचे शिवार कोरडे पडत असते. उन्हाळ्यात डोंगर बोडके व्हायचे, जेथे दृष्टी जाईल तेथपर्यंत कुसळं उगविलेली दिसत असत. हे गाव २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ठ झाले. त्यात संरक्षित सिंचनासाठी डीप सीसीटी, लूज बोल्डर, छोटे तलाव, बंधारा रुंदीकरण अशी कामे करण्यात आली. सिमेंट बंधारे पाच, माती नालाबांध पाच, अनघड दगडी बांध १०४, यांत्रिकीकरण विभागामार्फत १४० हेक्‍टरवर खोल सलग समतल चराचे काम, १५ हेक्‍टर क्षेत्रावर सलग समतल चर अशा विविध कामांमुळे १२०.४५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे.  जलसंधारणाच्या कामांमुळे पीक पद्धतीतही अनाकलनीय बदल झाला. "जलयुक्त''च्या कामांपूर्वी फक्त ज्वारी आणि सोयाबीन पिके घेतली जात हाती. आता ऊस, हळद, आले यासारखी नगदी पिके घेतली जात असून, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. गावात चांगला पाऊस झाला तरीही पाणी वाहून जायचे. शाश्वत पाणी उपलब्ध झाल्याने आले, हळद, ऊस अशी नगदी पिके घेऊ लागलो आहे. त्यास मंडल कृषी अधिकारी रविराज कदम, भरत रणवरे, कृषी सहायक अजय पवार यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे ग्रामस्थ श्रीरंग पवार यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT