आंदोलकांनी उभारली स्वच्छतागृहे, गाझीपूर सीमेवर सुरक्षेसाठी बसविले कॅमेरे  
मुख्य बातम्या

आंदोलकांनी उभारली स्वच्छतागृहे, गाझीपूर सीमेवर सुरक्षेसाठी बसविले कॅमेरे 

कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन बुधवारी (ता. १७) ८४ व्या दिवशी सुरू होते. गाझीपूर सीमेवर आंदोलकांनी त्यांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तात्पुरती शौचालये उभारली आहेत.

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन बुधवारी (ता. १७) ८४ व्या दिवशी सुरू होते. गाझीपूर सीमेवर आंदोलकांनी त्यांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तात्पुरती शौचालये उभारली आहेत.  एएनआयशी बोलताना आंदोलक दिनेश शर्मा म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच पूर्तता करण्यासाठी शौचालयांची उभारणी केली आहे.आमचे पंतप्रधान नेहमीच स्वच्छतेबद्दल बोलत असतात, म्हणून शेतकरी म्हणून आम्ही गाझीपूर सीमेवर स्वच्छता राखण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहोत. त्यासाठी येथे शौचालयेही बसविली आहेत. मागील काळात काही गुंडांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी गैरवर्तन केले होते, म्हणूनच भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून आंदोलनस्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.’’ 

सीमेवरही भाजीपाला पिकविण्याचा विचार  ‘‘सीमेवर दोन्ही बाजूंनी भाजीपाला पिकविण्यासाठी जमीन आहे. सरकारशी आमचा दीर्घकाळ चालणारा लढा आहे, म्हणून आम्ही येथे बराच काळ थांबू. लांबच्या लढाईसाठी ठोस तयारी करावी लागणार आहे. आजूबाजूची जमीन साफ करून शेतीसाठी योग्य करून भाजीपाला पिकविण्याचा विचार आहे. सरकार त्यांना पाहिजे तितका वेळ घेऊ शकते. पण शेतकरी त्यांचा हक्क घेतल्याशिवाय जाणार नाहीत, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो, ’’ असेही दिनेश शर्मा म्हणाले. आणखी एक आंदोलक वीरेंदर सिंग यांनीही असेच मत व्यक्त केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Damage : सप्टेंबरमध्ये तीन जिल्ह्यांत कपाशीचे ६ लाख ४६ हजार हेक्टरवर नुकसान

Book Review: ‘एआय’च्या जनकाची चरित्रगाथा

Nature Connection: ...म्हणून डोळे भरून पाहायचे!

Interview with Dr Chanda Nimbkar: गोवंश हत्या बंदी कायदा गोसंवर्धनासाठी मारक

Smartphone Usage: स्मार्ट फोनचा भस्मासुर

SCROLL FOR NEXT