केंद्रीय पथकाकडून आज परभणीत दुष्काळी पाहणी
केंद्रीय पथकाकडून आज परभणीत दुष्काळी पाहणी 
मुख्य बातम्या

केंद्रीय पथकाकडून आज परभणीत दुष्काळी पाहणी

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यात यंदा सलग दुसऱ्या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बीतही दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथक जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) दुष्काळी पाहणीसाठी येत आहे. केंद्रीय पथकाने केंद्र शासनाला दुष्काळ निवाणार्थ ठोस उपाययोजना आणि शेतकऱ्यांना भरीव मदतीची शिफारस करावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४.५९ मिलिमीटर आहे. या वर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत ४९४.२ मिलिमीटर (६०.६ टक्के) पाऊस झाला. यंदा वार्षिक पावसात ३६.४० टक्के पावसाची तूट आली आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेचा फटका जिंतूर, गंगाखेड, पूर्णा या तीन तालुक्यांना बसला आहे.

खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कापूस या पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. रब्बीची केवळ ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. पालम या कायम दुष्काळी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सर्वात कमी आहे. भूजलपातळी खोल गेली आहे. जलयाशयातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येत आहे. जनावराच्या चाऱ्याची समस्या गंभीर होणार आहे.

पथकाचा शेतकऱ्यांशी संवाद

केंद्रीय पथक गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता गणेशपूर (ता. सेलू), सव्वाबारा वाजता पेडगाव (ता. परभणी) आणि दुपारी एक वाजता रुढी (ता. मानवत) या गावांच्या शिवारास भेटी देऊन पीकस्थितीची पाहणी करणार आहे. या वेळी पथकातील सदस्य शेतकऱ्यांशी संवादही साधतील. या पथकामध्ये निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अप्पर सचिव एस. एन. मेहरा यांचा समावेश आहे. कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे रांजणकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर आदी या वेळी उपस्थित राहतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT