balaseheb patil.  
मुख्य बातम्या

पीककर्ज वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ : बाळासाहेब पाटील

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ या वर्षांत दिलेल्या पीककर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोजेन्सिस वृत्तसेवा

पुणे ः राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ या वर्षांत दिलेल्या पीककर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

मंत्री पाटील म्हणाले, की राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्‍भवलेल्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करतात. अशा शेतकऱ्यांना पीककर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येते. या वाढीव मुदतीत पीककर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय देखील काढण्यात आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Crop Survey: पीक पाहणी’चे कवित्व कधी संपणार?

Political Warning: फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास गंभीर परिणाम : नितेश राणे

Turmeric Conference: शेतकरी संघटनेची गुरुवारी वसमत येथे हळद परिषद

Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात

Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे भातरोपे तरारली

SCROLL FOR NEXT