जीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन Time constraints in Nashik for essential establishments 
मुख्य बातम्या

जीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन

कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घातले आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासह नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे दिली. 

‘ब्रेक द चेन’ या शासन आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर बाबींचे आस्थापना बंद करण्याचे आदेश या पूर्वी काढण्यात आलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत योग्य कारणाशिवाय व परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्तीस फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने जीवनावश्यक बाबींवर काही वेळेचे बंधन असणे आवश्यक असल्याची बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आली. त्याप्रमाणे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित रित्या उपलब्ध होतील व त्याचबरोबर संचारबंदी काळात नागरिक कोणत्याही कारणाने बाहेर पडणार नाहीत याचा योग्य मेळ साधून जीवनावश्यक बाबींच्या दुकानांवर सुद्धा वेळेबाबत काही निर्बंध लावण्याचे बैठकीत ठरले.

असे असतील निर्बंध  

  •   जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत; मेडीकल, वैद्यकीय सेवा २४ तास 
  •   किराणा व भुसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णत:बंद
  •   ज्या किराणा दुकानांमधून दूध अथवा भाजीपाला विक्री होते, अशा दुकानांसमोरील जागेत टेबलद्वारे दूध व भाजीपाला विकण्यास परवानगी 
  •   पूर्णपणे केवळ दूध भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू
  •   शेती निविष्ठा आणि अवजारे यांच्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू 
  •   टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू; मात्र संबंधित पोलिस स्टेशनची परवानगी आवश्यक
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

    Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

    Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

    Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

    Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

    SCROLL FOR NEXT