राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा 
मुख्य बातम्या

राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा

वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यातच राज्यात विजा, मेघगर्जनांसह वळीव पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ७) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून केरळ, कर्नाटक, उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. तमिळनाडूपासून अरबी समुद्रापर्यंत पूर्व-पश्‍चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रसह दक्षिण भारतात पावसाला पोषक हवामान आहे. जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे.
  • विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • कोकण : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड.
  • मध्य महाराष्ट्र : नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर.
  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. 
  • बुधवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) 

  • कोकण : सिंधुदुर्ग : दोडामार्ग ४१, कुडाळ ४०, सावंतवाडी ३६.
  • मध्य महाराष्ट्र : सोलापूर : माळशिरस ४४, पंढरपूर ५२.
  • मराठवाडा : बीड : शिरूर कासार ४०.
  • पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ रविवार (ता. १०) पर्यंत हवेचा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. १५) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

    Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

    Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

    Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

    Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

    SCROLL FOR NEXT