Three officers convicted for misconduct in Akole taluka
Three officers convicted for misconduct in Akole taluka 
मुख्य बातम्या

अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन अधिकारी दोषी

टीम अॅग्रोवन

नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीच्या कार्यालयातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झालेली आहे. पहिल्या अहवालात तीन ग्रामसेवक दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या अहवालात तीन अधिकारी दोषी असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. त्यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकूण तीन पथके नियुक्त केली होती. त्यातील पहिल्या पथकाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे. त्यात तीन ग्रामसेवक दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

दुसऱ्या चौकशी समितीच्या चौकशीमध्येही काही अंशी अपहार स्पष्ट झाला आहे. त्यामुळे तीन अधिकाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवून तसा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांना सादर करण्यात येणार आहे. त्यावर त्यांच्याकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोले तालुक्‍यातील गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशी समितीत पारनेरमधील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे, अहवालही पारनेरमध्ये तयार केला जात आहे. त्यामुळे पारनेरमध्ये अकोल्यातील लोकांचा वावर वाढला आहे. 

पारदर्शकतेमुळे लागतोय अवधी  पाच ग्रामपंचायती व गटविकास अधिकाऱ्यांविरोधात गैरव्यवहाराची तक्रार असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व बाबींची पडताळणी करूनच संबंधितांना दोषी ठरविले जात आहे. पारदर्शक चौकशी सुरू असल्याने अहवाल तयार होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT