प्रातिनिधीक आणि संग्रहित छायाचित्र, कोरोनाच्या काळात खबरदारी घेऊन वितरण होणार आहे
प्रातिनिधीक आणि संग्रहित छायाचित्र, कोरोनाच्या काळात खबरदारी घेऊन वितरण होणार आहे 
मुख्य बातम्या

रेशनकार्डवर तीन महिन्यांचे धान्याचे वाटप सुरू

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्यवाटप राज्यातील रेशन कार्डधारकांना बुधवारपासून (ता.१) सुरू करण्यात आले आहे.  पुणत जिल्ह्याबाबत बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, की मे व जून करिताचे ७७३७ टन गहू व ५०९६ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना १० एप्रिलपासून पुरविण्याचे नियोजन आहे. हे धान्य केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील रेशन कार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. एका निर्धारित वेळापत्रकात दहा कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील. सोशल डिस्टसिंगकरिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात आले आहे.निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदार दूरध्वनीकरुन बोलवून घेतील. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये, याकरीता कार्डधारकांच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ आदींची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक, तसेच ०२०- २६१२३७४३ हा मदत केंद्र क्रमांक  उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. साठेबाजी रोखण्यासाठी ११ पथके जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय ११ पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधांची सद्यःस्थितीत एकूण २७ हजार २१० दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरिता बाजारसमिती, होलसेल व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन, व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT