संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगरमधील छावण्यांतील तीन लाख पशुधनावर प्रतिदिन पावणेतीन कोटींचा खर्च

टीम अॅग्रोवन

नगर : दुष्काळी स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पशुधन जगविण्यासाठी प्रशासनाने ५१० छावण्यांना मंजुरी दिली आहे. त्यातील ५०० छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. यात तीन लाख १८ हजार २७४ जनावरे दाखल झाली आहेत. यावर सरकारचा प्रतिदिन दोन कोटी ६७ लाख १५ हजार १५० रुपये खर्च होत आहे.

गतवर्षी पावसाने दडी मारल्याने पाणी व चाराटंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले. जिल्ह्यात लहान-मोठ्या जनावरांची संख्या २८ लाख आहे. यात १७ लाख दुभती जनावरे आहेत. पशुधनाला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठविला होता. त्याआधारेच २५ जानेवारीला छावण्या सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. अटी व शर्तींच्या पूर्ततेनंतर तब्बल ५१० चाराछावण्यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंजुरी दिली. पशुधन जगविण्यासाठी सुरू केलेल्या या छावण्यांमध्ये सध्या ७० हजार पशुपालकांचा मुक्काम आहे.

प्रशासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. छावण्यांच्या तपासणीसाठी प्रशासनाने ३२ पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांच्या अहवालानुसार प्रशासनाने, पशुधनाच्या सेवेत कुचराई करणाऱ्या १३६ संस्थांना ४५ लाखांचा दंडही केला आहे. छावण्या चालविण्यासाठी चालकांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तसेच, पशुधनाच्या सेवेत अडचणी येऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून छावणीचालकांना ५० टक्के खर्च थेट खात्यांवर वर्ग करण्यात आला आहे.

तालुकानिहाय छावण्या, पशुधन
पाथर्डी   १०७ ६६,४३२
कर्जत  ९७ ५६,७२६
जामखेड ६९ ४३,४७९
नगर   ६६ ५०,६४३
पारनेर ४१ २९,८९५
शेवगाव  ६४ ३७,७५५
श्रीगोंदे ५५ ३२,९३६
नेवासे  एक ४०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT