संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

थायलंडमधून तांदूळ निर्यात नऊ टक्क्यांनी घटणार : यूएसडीए

कोजेन्सिस वृत्तसेवा
नवी दिल्ली ः जागतिक स्तरावर तांदूळ निर्यातीत थायलंड हा भारताचा मोठा स्पर्धक अाहे. थायलंडमधून यंदा (२०१७-१८) होणाऱ्या तांदूळ निर्यातीत ९ टक्क्यांनी घट होईल. या देशांतून १० दशलक्ष टन तांदूळ निर्यात होणार अाहे, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) जाहीर केला अाहे.
दरम्यान, भारतातील भात उत्पादन वाढणार असल्याचे संकेत ‘यूएसडीए’ने दिले अाहेत. गेल्या वर्षी (२०१६-१७) थायलंड सरकारने तांदूळसाठ्यात कपात केली. यामुळे या देशातून होणाऱ्या तांदूळ निर्यातीत घट होणार अाहे.
 
या देशातून गेल्या वर्षी ११ दशलक्ष टन तांदूळ निर्यात झाली होती. यंदा येथील उत्पादन स्थिर अाहे. यंदा येथील भात उत्पादन २०.४ दशलक्ष टनांवर पोचेल. हे उत्पादन सहा टक्क्यांनी अधिक असेल, असे ‘यूएसडीए’ने नमूद केले अाहे.
 
सप्टेंबर महिन्यात येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुराचे पाणी तत्काळ ओसरल्याने भातपिकावर त्याचा परिणाम झालेला नाही. देशातील हवामान यंदा भातपिकासाठी पोषक राहिले अाहे. यामुळे उत्पादन वाढणार असल्याचे चित्र दिसत अाहे.
 
भारतातील उत्पादन ११० दशलक्ष टनांवर
भारतातील भात उत्पादन यंदा ११० दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए’ने व्यक्त केला अाहे. उत्तर भारतात भातपिकासाठी पोषक हवामान राहिले अाहे. यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे.
 
दरम्यान, भारतातील कृषी अाणि अन्नप्रक्रिया उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या अाकडेवारीनुसार, भारताने गेल्या वर्षी ६.८२ दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात केली अाहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Packaging : उत्पादनाच्या गुणधर्मानुसार निवडा स्मार्ट पॅकेजिंग

Maharashtra Land Survey: सहा महिने वाट पाहावी लागणार नाही, आता जमीन मोजणी होणार ३० दिवसांत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Indian Agriculture: पंतप्रधान धन-धान्य कृषी आणि कडधान्ये आत्मनिर्भरता योजना शेतकऱ्यांचे भविष्य बदलतील- पंतप्रधान मोदी

Millet Farming : भरड धान्य आधारित संवर्धित शेती

Coconut Processing : नारळावर प्रक्रिया करून नफा मिळवा

SCROLL FOR NEXT