textile park
textile park 
मुख्य बातम्या

जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडले

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया होऊन त्याला चांगले दर मिळावेत, यासाठी जामनेर (जि. जळगाव) येथे नियोजीत टेक्स्टाईल पार्क रखडले आहे. या पार्कसाठी आवश्‍यक एक हजार एकर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु पुढील कार्यवाही थंड आहे.  मागील भाजप-सेनेच्या सरकारमध्ये टेक्स्टाईल पार्कसंबंधी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या सहकार्याने यासाठी आवश्‍यक जागा व इतर बाबींबाबत कार्यवाही हाती घेण्यात आली. मागील वर्षी जमीन अधिग्रहण कार्यवाही झाली. शासकीय जागा यासाठी घेण्यात आली आहे. खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे. त्याची अधिकाधिक खरेदी गुजरातमधील कारखानदार दरवर्षी करतात. तसेच खानदेशलगत पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना या भागातही कापसाचे जोमदार उत्पादन घेतले जाते. या भागातील कापसावर प्रक्रिया होण्यासाठी टेक्स्टाईल पार्क आवश्‍यक होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खानदेशात टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती. परंतु यासंदर्भात पुढे कार्यवाही झाली नाही. आता जामनेरातील टेक्स्टाईल पार्कचा मुद्दाही मागे पडला आहे.  कुठल्याही हालचाली सुरू नाहीत टेक्स्टाईल पार्कसाठी बरड किंवा नापीक जमीन घेतली असून, त्यात कापसापासून रुई, धागा व कापड निर्मिती करण्यासंबंधीचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मूलभूत सुविधा, प्रकल्प उभारणी हाती घेतलेली नाही. सुमारे १०० ते १५० कोटी रुपये किमान निधी या कामासंबंधी आवश्‍यक आहे. परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रशासकीय व शासकीय स्तरावरही या प्रकल्पाबाबत कुठल्याही हालचाली सुरू नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT