Ten thousand quintals of gram paid in Parbhani, Hingoli district
Ten thousand quintals of gram paid in Parbhani, Hingoli district 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली जिल्ह्यात दहा हजार क्विंटल हरभऱ्याचे चुकारे अदा

टीम अॅग्रोवन

परभणी : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गंत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या १३ केंद्रांवर शनिवार (ता.२७) पर्यंत ६ हजार ३३ शेतकऱ्यांच्या ८३ हजार ९६२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर ७४० शेतकऱ्यांच्या १० हजार ७७४ क्विंटल हरभऱ्याचे ५ कोटी २५ लाख २७ हजार २४९ रुपयांचे चुकारे देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हमीभावाने हरभरा विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा, बोरी येथील केंद्रांवर एकूण ११ हजार ६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी पालम वगळता अन्य ७ केंद्रांवर शनिवार (ता.२७) पर्यंत २ हजार ३७५ शेतकऱ्यांचा २९ हजार ८३० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ केंद्रांवर ९ हजार ८४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३ हजार ७०८ शेतकऱ्यांचा ५४ हजार १३१ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.  हरभऱ्याचे ५ कोटींचे चुकारे अदा 

परभणी जिल्ह्यातील ३४८ शेतकऱ्यांना ४ हजार ४४४ क्विंटल हरभऱ्याचे २ कोटी १६ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे, तर हिंगोली जिल्ह्यातील ३९२ शेतकऱ्यांना ६ हजार ३३० क्विंटल हरभऱ्याचे ३ कोटी ८ लाख ६२ हजार ७४९ रुपये देण्यात आले.  तुरीचे २९ कोटी वाटप 

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ३८ हजार १७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी सोमवार (ता.१५) पर्यंत ११ हजार ६६० शेतकऱ्यांची ९८ हजार ८४ क्विंटल तूर खरेदी झाली. आजवर एकूण ५ हजार ६४९ शेतकऱ्यांना ५० हजार ८० क्विंटल तूरीचे २९ कोटी ४ लाख ६६ हजार ६६८ रुपयांचे चुकारे दिले गेले. त्यात परभणी जिल्ह्यातील २ हजार २६ शेतकऱ्यांच्या १० कोटी ४६ लाख २४ हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार ६२३ शेतकऱ्यांच्या १८ कोटी ५८ लाख ४२ हजार रुपयांच्या चुकाऱ्यांचा समावेश आहे.  केंद्रनिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये) 

केंद्र शेतकरी संख्या हरभरा खरेदी
परभणी ४५४. ६३१४ 
जिंतूर १७५ २०५४
बोरी २६७ ३३६३ 
सेलू २१ २०७
पाथरी ६७४ ८७२५ 
सोनपेठ ३२८ ३४९२
पूर्णा ३६५ ४६२८
हिंगोली ९४७ १३८७२
कळमनुरी ९५६ १२३७६ 
वसमत ९७ १२२१
जवळाबाजार ५४२ ७०६९ 
सेनगाव ५७५ ९८५२ 
साखरा ५९१ ९७४० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT