हवामान वेगाने बदलले; ढगाळ हवामानाचा अंदाज
हवामान वेगाने बदलले; ढगाळ हवामानाचा अंदाज 
मुख्य बातम्या

हवामान वेगाने बदलले; ढगाळ हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या हवामानात गेल्या दोन-तीन दिवसांत वेगाने बदल झाले आहेत. बुधवारी (ता. ३०) हुडहुडणाऱ्या राज्याच्या किमान तापमान मोठी वाढ झाल्याने शनिवारी (ता.२) थंडी गायब झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्याने तापमान वाढले आहे. आज (ता. ३) राज्यात अंशत: ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.    उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढली होती. बुधवारी (ता. ३०) उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल ६ ते ८ अंशांची घट झाल्याने थंडीची लाट आली, तर कमाल तापमानात घट झाल्याने दिवसही थंड ठरले होते. मंगळवारी (ता. २९) सकाळी धुळे येथील कृषी महाविद्यालयात २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र दोनच दिवसांमध्ये किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. धुळे येथे तापमान १०.२ अंशांवर गेले आहे, तर नाशिक वगळता उर्वरीत सर्वच ठिकाणी किमान तापमान १२ अंशांच्या पुढे गेले आहे.  शुक्रवारी (ता. १) पंजाबपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय होता. त्यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. बंगालच्या उपसागरावरून राज्याकडे उष्ण वाऱ्यांचे प्रवाह वाढले. परिणामी राज्यातील किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली. शनिवारी (ता.२) हा कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र ते मालदीव बेटांपर्यंत सक्रिय होता. त्यामुळे आज (ता. ३) दुपारनंतर राज्यात बहुतांशी ठिकाणी हवामान अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.    शनिवारी (ता.२) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.७(१), नगर १२.०(०), जळगाव १२.०(०), कोल्हापूर १७.५४(१), महाबळेश्‍वर १३.९(०), मालेगाव १३.४(२), नाशिक ११.३ (०), सांगली १४.१(-१), सातारा १४.७(१), सोलापूर १६.८(०), सांताक्रुझ १६.०(-२), अलिबाग १७.५(०), रत्नागिरी १८.०(-१), डहाणू १७.२(०), आैरंगाबाद १५.०(२), परभणी १५.८ (१), नांदेड १६.० (२), अकोला १५.३(०), अमरावती १५.२(०), बुलडाणा १५.० (-१), चंद्रपूर १४.२(-१), गोंदिया १२.९(-१), नागपूर १२.१(-२), वर्धा १५.२(०), यवतमाळ १२.४(०).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT