Tehsildar's visit to the affected area
Tehsildar's visit to the affected area 
मुख्य बातम्या

काकडा परिसरात बाधित क्षेत्राला तहसीलदारांची भेट

टीम अॅग्रोवन

काकडा, जि. अमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासोबतच संत्रा फळगळ देखील होत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तहसीलदारांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

काकडा परिसरात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस बरसला. त्यात हवा असल्याने याचा फटका संत्रा पिकासह सोयाबीन, तूर या पिकांना ही बसला. हिरवी संत्रा फळ गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काकडा, शिंदी, कुष्टा, पोही, जानोरी, इसापूर या भागात वादळीवाऱ्यात झालेल्या पावसामुळे संत्रा फळांचा सडा पडला. शिंदी येथील अशोक घाडगे यांच्या एक हेक्‍टर क्षेत्रावरील संत्रा पिकाचे नुकसान झाले.

पावसाचे पाणी शेतात शिरल्याने काही शेत खरडून गेली. काही नागरिकांच्या घरात सुद्धा पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान सोसावे लागले. झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची होती. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, मंडळ अधिकारी नरेंद्र धोटे, तलाठी किरण गोंगे, काकडा सरपंच ईश्वरदास वानखेडे यांनी बाधीत शेत आणि घरांची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार जाधव व कृषी अधिकारी सातव यांनी तलाठी व कृषी सेवकांना सर्व्हेक्षणाचे आदेश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT