बीटी बियाणे
बीटी बियाणे 
मुख्य बातम्या

तेलंगण पोलिस घेत आहेत कॉल डिटेल्सची माहिती

टीम अॅग्रोवन

यवतमाळ  ः बीटी तस्करांनी हत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी (ता. ६) यवतमाळ पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. आदिलाबाद पोलिस अधीक्षकांच्या संपर्कात राहून या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. खासदार भावना गवळी तसेच आमदार अशोक उईके यांनीदेखील हे प्रकरण गंभीरतेने घेत तेलंगण पोलिसांशी संपर्क साधला. पिंपरी दुर्ग (ता. राळेगाव) हे जेमतेम लोकवस्तीचे गाव. याच गावातील अनेकांनी या हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर एच. टी. बीटीची खरेदी केल्याचे सांगितले जाते. रामगंगा नदी गावालगत वाहत असल्याने त्यातील पाण्याचा उपयोग येथील शेतकरी करतात. या भागात कापसाची लागवड सर्वाधिक होते. या वर्षी एच.टी. बीटी लागवडीचा निर्णय गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार काहींनी तेलंगणा राज्यातील बीटी तस्करांशी संपर्क साधत त्यांच्याकडून बीटी बियाणेदेखील आणल्याची माहिती आहे.  गावातील प्रत्येक जण बीटी तस्करांशी संपर्क साधत असल्याने अमित इंगोले यांनीदेखील बीटी तस्करांशी संपर्क साधला. त्यांना ३१ मे रोजी आदिलाबाद येथे बोलावण्यात आले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेत तस्करांनी त्यांना कोल्ड्रिंक पिण्यासाठी दिले. राष्ट्रीय महामार्गावर थांबवून ठेवत त्याच ठिकाणी बीटी बियाण्यांचा पुरवठा करणार असल्याचे त्यांना सांगितले. बीटी तस्कर निघून गेल्यावर कोल्ड्रिंकमधील विषाचा शरीरावर परिणाम होण्यास सुरवात झाली. यातच अमित इंगोले यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आदिलाबाद पोलिसांनी प्राथमिक चौकशीत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतू अमितचे भाऊ आशिष यांनी पोलिस तक्रार करीत हे प्रकरण हत्येचे असल्याचा आरोप केला आहे. बीटी तस्कारांनीच ही हत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  पोलिस अधीक्षकांची भेट दरम्यान, याप्रकरणी योग्य तपास व्हावा, त्याकरिता तेलंगण पोलिसांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके यांनी यवतमाळ पोलिस अधीक्षकांना दिले. आदिलाबाद पोलिसांशीदेखील भावना गवळी यांनी संपर्क साधला. मृतकाच्या कुटुंबीयांनीदेखील गुरुवारी (ता. ६) यवतमाळ पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेत तपास योग्य व्हावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT