तोलणाऱ्यांना कामावर घ्या, अन्यथा व्यापाऱ्यांवर कारवाई ः प्रशासक देशमुख
तोलणाऱ्यांना कामावर घ्या, अन्यथा व्यापाऱ्यांवर कारवाई ः प्रशासक देशमुख 
मुख्य बातम्या

तोलणाऱ्यांना कामावर घ्या, अन्यथा व्यापाऱ्यांवर कारवाई ः प्रशासक देशमुख

टीम अॅग्रोवन

पुणे : तोलाईच्या प्रश्नाबाबत पणन संचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत शेतीमालाच्या पट्टीत तोलाई कपात न करता तोलणाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असा आदेश बाजार समितीने दि पूना मर्चंट्‌स चेंबरला दिला आहे. तोलणाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले नाही, तर संबंधित व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचा इशारा बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिल्यानंतर व्यापारीदेखील आक्रमक झाले आहेत. तोलणाऱ्यांना कामावर घेऊ, मात्र त्यांना कोणतीही वजनमाप पट्टी अथवा रेकॉर्ड घेण्यास मान्यता देणार नाही, असा पवित्रा मर्चंट्स चेंबरने घेतला आहे.

पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील तोलाईबाबत आता बाजार समिती प्रशासन आणि मर्चटस् चेंबर वाद चिघळण्याची शक्यता आहे. आम्ही राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करत असून, शासन आदेशाची अंमलबजावणी केली म्हणून बाजार समिती कारवाई करणार असेल, तर आम्हीच दुकाने बंद करून त्यांच्या ताब्यात चाव्या देऊ. त्यांनीच व्यापार करावा, असा पवित्रा चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी घेतला आहे. 

तोलाईच्या प्रश्नावरून महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापारी विरुद्ध तोलणार, असा वाद निर्माण झाला होता. याप्रश्‍नी पणन संचालक किशोर तोष्णीवाल, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख आणि दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी (ता. ६) बैठक झाली. त्यामध्ये तोलणाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना पणन संचालकांनी चेंबरच्या व्यापाऱ्यांना दिल्या. या बैठकीनंतर समितीचे प्रशासक देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.

देशमुख म्हणाले, ‘‘तोलाई कपात न करता तोलणाऱ्यांना कामावर रुजू करण्याच्या लेखी सूचना एक मार्च रोजी चेंबरला दिल्या. तर, तोलणाऱ्यांनाही कामावर रुजू व्हावे, अशा लेखी सूचना दिल्या. मात्र, तोलणार आणि हमालांनी गेल्या शनिवारी भुसार विभाग ठेवून बेमुदत बंद पुकारला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तोलाई कपात न करता तोलणाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सहमती दर्शवित आंदोलन स्थगित केले. मात्र, भुसार विभागातील व्यापाऱ्यांनी तोलणारांना कामावर घेण्यास नकार दिला. त्यावर आज पणन संचालकांकडे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये तोलाई प्रश्‍नासंदर्भात नेमलेल्या समितीचा निर्णय येईपर्यंत तोलाई न कापता तोलणाऱ्यांना कामावर घेण्याच्या सूचना पणन संचालकांनी चेंबरला केली आहे. चेंबरनेदेखील त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता तोलणाऱ्यांना कामावर हजर करून न घेतल्यास संबंधित व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT