स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील गोळीबाराची चौकशी सुरू
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील गोळीबाराची चौकशी सुरू 
मुख्य बातम्या

स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील गोळीबाराची चौकशी सुरू

टीम अॅग्रोवन

अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष व वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आघाडी पुरस्कृत उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावरील हल्ला प्रकरणात मंगळवार (ता. २२) पर्यंत कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान भुयार यांच्या गाडीवर गोळीबार झाला किंवा नाही याची खातरजामा करण्यासाठी घटनास्थळावरून काही नमुने घेत ते फॉरेन्सिक लॅबला पाठविले, असे पोलिस निरीक्षक एस. एम. गेडाम यांनी सांगितले.

वरुड-मोर्शी मतदारसंघात देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेदवार, तसेच कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यात थेट लढत आहे. देवेंद्र भुयार यांनी शेतकरी पूत्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदारकीची संधी देण्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले होते. दुसरीकडे सिंचन सुविधात वाढ, संत्रा प्रक्रिया उद्योग या भागात आणण्यासाठी निवडून देण्याची साद कृषिमंत्री डॉ. बोंडे यांनी घातली होती. दोघांच्या प्रचाराचा ज्वर वाढल्याने या मतदारसंघातील वातावरणही चांगलेच तापले होते. दरम्यान ऐन मतदानाच्या दिवशी (ता. २१) पहाटे साडेपाच वाजता मलकापूरकडे जात असलेल्या देवेंद्र भुयार यांच्या कारवर तीन गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप आहे.

हा हल्ला कसाबसा चुकवीत देवेंद्र भुयार यांच्यासह गाडीतील तिघांनी हल्लेखोरांच्या तावडीतून पळ काढला. त्यानंतर हल्लेखोरांनी गाडीला आग लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शेंदूरजना घाट पोलिसांत अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश नागपुरे यांनी तक्रार दिली होती.  दरम्यान या संदर्भाने देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मात्र पराभव दिसत असल्याने हे कुंभाड स्वतःच आघाडीच्या उमेदवाराने रचल्याचे सांगितले. 

या प्रकरणी अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या संदर्भाने सत्यता पडताळण्याकरिता घटनास्थळावरील साहित्याचे नमुने घेत फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे.  - एस. एम. गेडाम,  पोलिस निरीक्षक, शेंदूरजनाघाट, ता. वरुड, जि. अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT