स्वाभिमानीची शनिवारी जयसिंगपुरात ऊस परिषद
स्वाभिमानीची शनिवारी जयसिंगपुरात ऊस परिषद 
मुख्य बातम्या

स्वाभिमानीची शनिवारी जयसिंगपुरात ऊस परिषद

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद शनिवारी (ता. २८) जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर दुपारी दोन वाजता परिषदेस प्रारंभ होइल. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या हंगामात कोणता दर असावा, याबाबतची मागणी या परिषदेत केली जाईल. यानंतर ऊस आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे.  जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीही यंदाच्या हंगामात कोणता दर द्यायचा, याबाबची भूमिका ऊस परिषदेनंतर घेण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानीची ऊस परिषद होण्यापूर्वीच पहिला हप्ता ३५०० रुपये मिळावा, या मागणीसाठी इतर शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानीची काय मागणी राहते, याकडे शेतकऱ्यांबरोबर कारखानदारांच्यातही उत्सुकता आहे.  या परिषदेत श्री. शेट्टी हे साखरदराबरोबर गेल्या वर्षभरात इतर उपपदार्थांची काय स्थिती राहिली, केंद्राचे काय धोरण राहिले, यानुसार किती दर योग्य आहे, याचा तपशीलवार आढावा घेणार आहेत. यंदाच्या हंगामाची रणनीती तेच जाहीर करतील. यंदाची ऊस परिषद त्यांचे एकेकाळची मुलूख मैदान तोफ सदाभाऊ खोत यांच्याविनाच होणार आहे. या तोफेची कमान वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर हे सांभाळणार आहेत. यामुळे सदाभाऊंच्या गच्छंतीनंतर त्यांच्याविषयी परिषदेत काय चर्चा होते, याकडेही ऊस उत्पादकांचे लक्ष असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT