स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखली Swabhimani's Kadaknath struggle stopped the procession
स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखली Swabhimani's Kadaknath struggle stopped the procession 
मुख्य बातम्या

स्वाभिमानीची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखली 

टीम अॅग्रोवन

सांगली : इस्लामपूर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी (ता. २७) सांगलीच्या स्टेशन चौकात रोखले. कडकनाथ संघर्ष यात्रा रोखताना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेसह २५ जणांना ताब्यात घेतले.   केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आत्मनिर्भर यात्रा जिल्ह्यात शुक्रवारी सुरू केली. या यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथे रविवारी (ता. २७) सायंकाळी होणार आहे. तत्पूर्वी आत्मनिर्भर यात्रेच्या निमित्ताने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेवरून राजकीय वातावरण तापले होते. आत्मनिर्भर यात्रेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष खराडे यांनी दिला होता. त्यासाठी सांगलीतील स्टेशन चौकातून कडकनाथ संघर्ष यात्रा आयोजित केली होती. दुपारी साडे बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष खराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते कडकनाथ कोंबड्यासह स्टेशन चौकात जमले होते. त्यांनी यात्रा काढण्यापूर्वीच सांगली शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कडकनाथ कोंबड्या उंचावून कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यामुळे स्टेशन चौकात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष खराडे यांच्यासह २५ जणांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT