उसाच्या उचल कपातीविरोधात ‘स्वाभिमानी’चा १७ ला मोर्चा
उसाच्या उचल कपातीविरोधात ‘स्वाभिमानी’चा १७ ला मोर्चा 
मुख्य बातम्या

उसाच्या उचल कपातीविरोधात ‘स्वाभिमानी’चा १७ ला मोर्चा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : उसाच्या ठरलेेल्या उचलीत साखर कारखान्यांनी कपात करून प्रतिटन २५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. याचा विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारीला येथील सहसंचालक साखर यांच्या कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सावकर मादनाईक व जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिली.  सावकर मादनाईक म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी साखरेच्या दराचे कारण पुढे करून प्रतिटन ५०० रुपये कपात करणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कपात करून शेतकऱ्यांच्या खात्यावर २५०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारने मध्यस्थी करून दरात कपात करण्यात देऊ नये, अशी मागणीदेखील केली होती. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी टनामागे सरासरी ५०० रुपयांची कपात केले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मिटलेला होता. मात्र आता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड करून बिले वर्ग केली आहेत, त्या साखर कारखान्यांवर त्वरित गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसत नाही.  साखरेच्या दरात थोडीशी सुधारणा झालेली दिसत आहे. मुळात साखरेच्या दरात ८ रुपये किलोमागे पडले आहेत. त्यामुळे राज्य बॅंकेने साखरेचे मूल्यांकनदेखील कमी केले आहे. केवळ २ रुपये दरात सुधारणा होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. गेल्या १० दिवसांपासून ठरलेल्या दरासाठी लढत आहोत. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी कपातीची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, तसेच ज्या साखर कारखान्यांनी कपात केली आहे. त्या साखर कारखानदारांवर त्वरित फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी हा मोर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT