Supply of hand sanitizer in Vidarbha from Tata Trust
Supply of hand sanitizer in Vidarbha from Tata Trust 
मुख्य बातम्या

टाटा ट्रस्टकडून विदर्भात हॅन्ड सॅनिटायझरचा पुरवठा 

टीम अॅग्रोवन

अमरावती ः कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या मोहिमेत सामाजिक जाणिवेतून योगदान देत टाटा ट्रस्टकडून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हॅन्ड सॅनिटायजरचे वितरण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला याचा पुरवठा निशुल्क करण्यात आला. 

टाटा ट्रस्टकडून गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषी विकासाला पूरक उपक्रमांवर काम होत आहे. या माध्यमातून आत्महत्या नियंत्रणासाठी ट्रस्टकडून सेवाभावीवृत्तीने विविध उपक्रमांकरिता निधी देण्यात आला. जलयुक्‍त शिवार, कुक्‍कुटपालन, डेअरी तसेच कृषी मार्केटिंग क्षेत्रातही टाटा ट्रस्टने योगदान दिले आहे. 

सद्यःस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. संसर्ग रोखण्याकरिता सामाजिक अंतर राखणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे तसेच वारंवार हात धुणे असा उपायांची शिफारस करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टकडून या मोहिमेत आपले योगदान म्हणून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.  अमरावती जिल्ह्यात २५०० लीटर हॅन्ड सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला. यावेळी टाटा ट्रस्टचे क्षेत्र व्यवस्थापक राहूल दाभने, दिनेश चौधरी, चंदन गवारे, असीत मोहन उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी वाव्हारे यांच्याकडे हॅन्ड सॅनिटायझर सोपविण्यात आले. 

सॅनिटायझरचे जिल्हानिहाय्य वितरण (लीटरमध्ये)
अमरावती २५०० 
वर्धा ३००० 
यवतमाळ १०००
अकोला ३००० 
चंद्रपूर २५०० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

Cotton Farming : कापसाची करुण कहाणी

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

SCROLL FOR NEXT